HW News Marathi
देश / विदेश

#Nirbhaya Case : आरोपींच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना उद्या १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती ती पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भया प्रकरणातील या नराधमांची फासीची शिक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली असून ही शिक्षा अनिश्चित काळासाठी फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. पुढच्या आदेशापर्यंत आरोपींना फाशी देण्यात येणार नाही अशी माहितीही कोर्टाने दिली आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता. यानंतर याचिकेवर (१६ जानेवारी) सुनावणी करताना पटियाला हाऊस न्यायालयाने फाशीच्या निर्णयाला ‘स्टे’ दिला होता. यामुळे निर्भयाच्या आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी दिली जाणार होती.

१६ डिसेंबरची ती काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताने युद्धाची भाषा केली तर मंदिरातील घंटानाद कधीही ऐकू येणार नाही !

News Desk

नारायण राणे फडणवीस आणि दरेकरांसह दिल्लीहून कोकणासाठी रवाना!

News Desk

“हा संपूर्ण विषय मी अमित शहा यांच्या कानावर टाकणार”, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Aprna