मुंबई – एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथुन केल्या प्रकरणी रविवारी अंधेरी पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. 28 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे गुरुवारी दुपारी एक व्यक्ती महिलेकडे पाहून मेट्रो स्टेशनवरच्या जिन्याजवळ हस्तमैथुन करत होता.
मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यानंतर मी एका व्यक्तीला हस्तमैथुन करताना पाहिले. माझ्याआधी दोन महिलांनी सुद्धा हे दृश्य पाहिले व त्यांनी रेल्वे स्टेशनवरच्या सिक्युरिटीला माहिती दिली. सुरक्षारक्षक या व्यक्तीच्या दिशेने गेल्यानंतर तो शिडीवरून खाली उतरून पळून गेला. सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पकडण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. फक्त तो तिथून निघून जाईल एवढेच पाहिले असे तक्रार दाखल करणा-या महिलेने म्हटले आहे. या महिलेने घाटकोपर मेट्रो स्थानकात लिखित तक्रार दिली त्यानंतर टि्वटरवरुन मेट्रोच्या अधिका-यांना माहिती दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post