पी. रामदास
ऑनलाइन आकर्षक मुलींसोबत गप्पा करणे किंवा व्हिडीओ चॅटींगसाठी गुगल प्ले स्टोरवर मीट फॉर यू नावाचे अॅप सध्या तेजीत आहे. तरुणांना गंडावून त्यांचे खिशे रिकामे करण्याचा हा गोरखधंदा सध्या जोरात सुरू आहे. फसवणूक झाल्यानंतर दाद मागण्यासाठी कुठलाही पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही.
सुंदर मुलींसोबत सेक्स विषयावर गप्पा मारण्यासाठी सुरुवातीला आकर्षक फोटो दाखवले जातात. मुलीचा मोबाइल क्रमांक, व्हाटसअप क्रमांकही दिला जातो. संपर्क साधल्यानंतर चॅट करण्यासाठी पेटीएमद्वारे दोनशे किंवा पाचशे रुपये मागितले जातात.
गोड गोड गप्पा रंगाआल्यानंतर आणखी पैशांची मागणी केली जाते. काहीजण यात वाहत जातात. मग व्हिडोओ चॅटींगचा पर्याय सांगितला जातो. त्यासाठी सातेशे ते आठशे रुपये आकारले जातात. पैसे मिळताच. मोबाईल बंद येतो.व ती व्यक्तीही गायब होत असल्याचे आढळून आले आहे. दोन, पाचशे रुपये विनाकारण गेल्याचा पश्चताप करण्यापलीकडे तरुणापुढे पर्याय उरत नाही. दोन-पाचशे रुपयासाठी पोलिसांत तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. दिवसभरात अशा प्रकारे अनेकांना गंडवले जात असून त्यातून बक्कळ कमाई केली जात आहे.
काही वेळ चॅटींग झाल्यानंतर भेटण्याचे निश्चित केले जाते. ठिकाण कळवल्यानंतर त्या भागातील मुली किंवा महिलांचा क्रमांक दिला जातो. किंवा संबंधित महिला आपणास भेटेल असे सांगून पुन्हा सातशे ते हजार रुपये गोळा केले जाते . उच्चभ्रू महिलांसोबत सेक्स करा १५ हजार रूपये कमावा असे एस्कोर्टमध्येही अशाच प्रकार गंडवण्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. मोबाइल क्रमांकाद्वारे विशिष्ट रक्कम अकारून उच्चभ्रू महिलांसोबत सेक्सचे अमिष दाखवले जाते. त्यासाठी आठशे ते हजार रुपयांचे कमिशन घेतले जाते.पैसे मिळताच महिलेचा फोन क्रमांक दिला जातो. परंतु काही वेळात संबंधित महिला व्यस्त असल्याचे सांगून वेळ मारून नेली जाते.संबंधित महिला उपलपब्ध नसल्याचे सांगून अर्धा तासाने फोन करण्याचे सांगण्यात येते. अर्धा तासात तो मोबाइल क्रमांक बंद येतो, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तोंड लपवण्यापलिकडे पर्याय उरत नाही. अश्याप्रकराे ऑनलाइन साइटद्वारे फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा तेजीत असून पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी तरुण करत आहेत. मुंबईतील नामांकित अंधेरी भागातील मुले-मुली याचा बळी ठरत आहेत. या भागात हा धंदा तेजीत सुरू आहे.
वाचा-
मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.