HW News Marathi
देश / विदेश

बँक कर्मचाऱ्यांकडून सलग तीन दिवसीय संप

मुंबई | बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी तीन दिवसाच्या संपावर जाणार आहे. या बँक कर्मचारी विविध मागण्यासाठी संपाची सुरुवात शुक्रवारीपासून (३१ जानेवारी) ते रविवारपर्यंत (२ फेब्रुवारी) असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची ‘इंडियन बँक असोसिएशन’ सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा झाली होती. परंतु ही चर्चा फिस्कटल्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (बँक कर्मचारी संघटना) तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे.

https://twitter.com/AIBEA_India/status/1221716108882956288?s=20

दरम्यान, बँक कर्मचारी संपावर असल्याने बँका बंद राहणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ३१ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार असून, (शनिवारी )१ फेब्रुवारी रोजी त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे मागण्या मान्य न झाल्यास मार्च महिन्यात पुन्हा एकदा संप पुकारणार असल्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त

News Desk

युट्यूब बंद पडते तेव्हा

swarit

तालीबानी थेट गोळ्या घालतील ,आई-वडिलांना भारतात आणण्यासाठी मोहम्मदची सरकारकडे याचना !

Jui Jadhav