HW News Marathi
महाराष्ट्र

…तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे !

जळगाव | “भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (नाथा भाऊ) यांनी मुलासारखे माझ्यावर प्रेम केले मात्र मुलगा मानले नाही,” असा आरोप राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथील एका कार्यक्रमात केला होता. गुलाबराव पाटील यांच्या आरोपांचे खंडण करत खडसे म्हणाले की, “गुलाबराव पाटील आमदार व्हावेत म्हणून पूर्वी ते जिल्हा परिषदेचे सभापती असल्यापासून मी त्यांनी पुढचा आमदार म्हणून त्यांना पुढे आणले. त्यावेळी त्यांच्या माध्यमातून अनेक कामे करुन घेतली. त्यामुळे त्यांना निवडणुकीत मदत झाली. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या मदतीने विकासासाठी चांगले प्रयत्न केले.”

“आता गुलाबराव म्हणतात खडसेंनी वडिलांप्रमाणे प्रेम केले, पण मुलगा म्हणून वागवले नाही. वडिलकीच्या नात्याने जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला मी प्रेम केले. यामध्ये पक्षाचाही प्रश्न असतो. आमचे पक्ष वेगवेगळे आहेत. पक्षाच्या धोरणानुसार, निर्णयानुसार वागावे लागते. शिवसेना भाजप जेव्हा एकत्र होते, तेव्हा आम्ही एकत्र काम केले. नंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले. तरिही मी जर वडिलकीच्या नात्याने प्रेम केले असे ते म्हणतात, तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे,” असे म्हणत खडसेंनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला.

आजपर्यंतच्या राजकीय जीवनात एकही निवडणूक हरलो नाही !

गेल्या ४० वर्षापासून मी राजकारणात आहे. माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात एकही निवडणूक हरलो नाही. सहकारी क्षेत्र असेल, कृषी बाजार समिती, आमदारकी अशा अनेक निवडणुकांना मी उभा राहिलो. यातील कोणतीही निवडणूक मी हरलो नाही. कार्यकर्त्यांमुळेच मी हरलो नाही. कार्यकर्त्यांची मेहनत आणि परिश्रम त्यात होती. म्हणूनच आजपर्यंत हरलो नाही. मात्र, असाही अनुभव आहे की काहीवेळा आपण आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना शुन्यातून वर आणण्याचा प्रयत्न करतो. असेच कार्यकर्ते कधीकधी नाराज होऊन धोका देतात.”

मी मोजक्या कार्यकर्त्यांना मोठे केले, वाढवले, विस्तार केला, त्यांचे शुन्यातून विश्व निर्माण केले. अशाच काही कार्यकर्त्यांमधील ५ ते ६ लोकांनी गद्दारी केली. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांची डीएनए टेस्ट करायला हवी होती, असे गुलाबराव यांना वाटू शकते, असेही एकनाथ खडसे यांनी नमूद केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मराठी पत्रकार संघाकडून निषेध

News Desk

शुट आउट अ‍ॅंड हिमायतबाग: आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी

News Desk

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna