HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

मुंबई | महापालिकेसाठी प्रकल्प आणा त्या प्रकल्पांना मी मंजुरी देणार असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनी वीर जिजामाता प्राणी संग्रहालयाच्या उद्घाटनावेळी केले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांनी एकच जल्लोष केला. आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.

“मुंबई महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देणार मी मुंबईचा मुख्यमंत्री आहे. आजपर्यंत मी हा सोहळा टीव्हीवर पाहत होतो. पण तुमच्यामुळे आज शिवाजी पार्कवर ध्वजारोहण करता आले. पूर्वीच्या सुविधा कमी पडत असल्याने नव्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था भक्कम करतोय आणि आता तर सरकार आपल्याकडे आहे”, असा संवाद त्यांनी लोकांशी साधला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईतील महत्त्वाच्या लोअर परळच्या पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचे काम अखेर सुरू होत आहे. शिवाय संत गाडगे महाराज चौक सातरस्ता या ठिकाणी दोन पुलांचंही भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. केशवराव खाड्ये मार्गावर हाजी अलीच्‍या दिशेने जाणाऱ्या आणि संत गाडगे महाराज चौक सातरस्ता इथून धोबी घाटमार्गे अर्थाय वरळी नाक्याच्या दिशेने नवा पुल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे कदाचित वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकेल या उद्देशाने या पुलाची बांधणी करणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षाचे लोकार्पण करत भक्तीपार्क उद्यान येथील मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा शुभारंभही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरण पूरक गणेश मुर्ती, सांगली जिल्ह्यातला आदर्श उपक्रम

News Desk

“योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीमध्ये मंदिरावरील भोंगे देखील बंद,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk