HW News Marathi
देश / विदेश

महापालिका उपायुक्त निधी चौधरींची महात्मा गांधींवरील वादग्रस्त ट्वीटनंतर सारवासारव

मुंबई | महात्मा गांधींचे फोटो नोटांवरून हटविण्याची मागणी करणारे ट्वीट बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी केले आहे. चौधरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, महात्मा गांधींचे नोटांवरुन फोटो काढून टाका, जगभरातील त्यांचे पुतळे हटवा, असे ट्विट केले होते. या वादग्रस्त ट्वीटनंतर चौधरींवर सर्व स्तरातून टीका होत असल्यामुळे त्यांनी ट्वीट डिलीट करून आपली बाजू सावरण्याची प्रयत्न करणारे ट्वीट केले आहे.

https://twitter.com/nidhichoudhari/status/1134520012398456832

१७ मे रोजी केलेले आपले ट्वीट वादाला कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ते ट्वीट डिलीट केले. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी काही ट्वीट्स केली आहेत. ‘काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचे ट्वीट डिलीट केले आहे. तुम्ही २०११ पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही’

‘१५० व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारी इमोजी) आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावे बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. ३० जानेवारी १९४८ रोजीचा’ अशा आशयाचे इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरींना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६२०००चा टप्पा, या शेअर्समध्ये जोरदार वाढ

News Desk

भारताच्या अंतराळ युगाचे जनक विक्रम साराभाई !

News Desk

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेत्याची आणीबाणीची पोस्टरबाजी

News Desk