HW News Marathi
देश / विदेश

अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर

नवी दिल्ली | देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यानंतर अजून एक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे पद्म पुरस्कार. आजच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्याची घोषणा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांच्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खासदार मेरी कोम, छन्नुलाल मिश्रा, अनेरूद जुगुनाथ जीसीएसके, विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण ११८ जणांना पद्मश्री, १६ जणांना पद्मभूषण आणि ७ जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर जाहीर झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपसभापती पदासाठी निवडणूक होणार 

News Desk

मुखमैथुन गंभीर गुन्हा, आज कोर्टाचा निर्णय

News Desk

‘ट्राय’च्या नव्या नियमाविरोधात केबल व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा

News Desk