HW News Marathi
देश / विदेश

अमित शहा यांनी स्वीकारला गृहमंत्रिपदाचा पदभार

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. मोदी सरकारने (३१ मे) खाते वापर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देशाचे नवे गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमित शहा यांनी शनिवारी (१ जून) केंद्रीय गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. राजनाथ सिंह यांच्याकडून शहा यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे.

गृहमंत्री झाल्यानंतर अमित शहा यांचा समावेश ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’मध्ये होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चौघेजण एकत्र काम करू शकणार आहे. भाजपच्या संकल्प पत्रात सीमा सुरक्षा, राम मंदिर आणि ३७० कलम रद्द यासारखे महत्त्वाचे मुख्य मुद्दे हे गृहमंत्र्यांशी निगडीत असून शहांना समोर सर्वात मोठे आवाहन आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्कराच्या कारवाईत काश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

News Desk

जाणून घ्या…लढाऊ विमान मिराज-२०००ची काही खास वैशिष्ट्ये

News Desk

कोपर्डी प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

News Desk