HW News Marathi
Uncategorized

सोनियांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली – शिमल्याला गेलेल्या सोनिया गांधी यांना घाई-घाईने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले आहे.

हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. डी.एस. राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजता सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधींची तब्येत ठीक नाही. याचवर्षी 8 मे रोजी सोनिया गांधींना फूड पॉइझनिंगमुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गेल्यावर्षी वाराणसीमध्ये एका निवडणूक प्रचार सभेदरम्यानही त्यांची तब्येत बिघडली होती.

शिमलामध्ये सोनिया गांधींच्या कन्या प्रियांका वाड्रा नवीन बंगला बांधत आहेत. तो पाहण्यासाठीच सोनिया गांधी शिमल्याल्या गेल्या होत्या असे सांगितले जात आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकींची घोषणा झाल्यानेही सोनियांनी गेल्या काही दिवसांत राज्याचा अनेकवेळा दौरा केला आहे. सोनिया सारख्या आजारी राहत असल्याने राजकारणातील त्यांचा सहभाग कमी होत असून राहुल गांधींकडेच आता पक्षाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कान्होजी आंग्रे’ यांची शौर्यगाथा सांगणार चित्ररथ राजपथावर नाही, ‘या’ ठिकाणी झळकणार

News Desk

व्याज दरात कपातीची शक्यता, महागाई कमी झाल्याने शेअर बाजाराची झेप

News Desk

“ते २५ वर्षे शिवसेनेतच होते”, संजय राऊतांची राणेंवर टीका

News Desk