HW News Marathi
Uncategorized

सुषमा स्वराज पुढच्या पंतप्रधान ?

सुजीत नायर

२०१९ साली होणाऱ्या लोकसभेची तयारी भाजपने आत्ता पासूनच सुरू केली आहे. ३८० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र सध्याची स्थिती पहाता भाजप एकट्याच्या जिवावर २०० जागां जिकू शकेल. त्यामुळे त्यांना ८० ते १०० जागा कमी पडणार आहेत. मोदी आणि शहा या जोडीने २०१४ साली जी कमाल करून दाखवली ती त्यांना पून्हा करणे तेवढे शक्य होणार नाही. त्यात एनडीएच्या मित्र पक्षा बाबतही संदिग्धता आहे. शिवसेना, टिडीपी, अकाली दल, बीजू जनता दला सारखे मित्र पक्ष एेन वेळी भाजपच्या विरोधात काम करण्याची शक्यताही दाट आहे. त्याला कारणही मोदी शहा यांची काम करण्याची पद्धत असणार आहे. याचा फटका २०१९ च्या निवडणूकीत निश्चित भाजपला बसू शकतो. अशा स्थितीत संघ परिवार आणि आरएसएसचे लक्ष ही मोदी शहा यांच्या रणनितीकडे असणार आहे. शिवाय सध्या मोदींची भाजप आणि पारंपारीक भाजप यांच्यात शित युद्ध सुरू आहे. त्यात मोदी सरकारच्या गुणवत्तेबाबतही संघ समाधानी नाही. शिवाय संघाचे कट्टर कार्यकर्ते हे मोदींचे भक्त तर नक्कीच नाहीत. त्यांची बांधिलकीही संघा बरोबर आहे. ही मोदी आणि शहांची मोठी अडचण झाली आहे. त्यातच उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या सारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. सध्या इथल्या सरकारांवर जनता नाराज दिसते. त्याचाही फटका २०१९ च्या निवडणूकीत बसण्याची दाट शक्यता आहे. त्यात बिहारमध्ये नितीश कुमार योग्य संधीची वाट पाहून युपीए आणि एनडीए असे दोन्ही ऑप्शन खुले ठेवतील असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मोदींच्या कार्यपद्धतीवर टिका करणारी एक फळी सध्या भाजपमध्ये आहे. काही नेत्यांनी तर खुल्या पद्धीने त्याबाबत टिका केली आहे. अशा नेत्यांना बळ देण्यासाठी अन्य भाजप नेते पुढे येवू शकतात. अनेकांना मोदी शहा यांची कार्यपद्धती पटत नाही. त्यात जूने भाजप नेत्यांचा अधिक समावेश आहे. त्यात संघही संधीच्या शोधात आहे. असा वेळी मोदी शहा यांना गुजरात आणि कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळवून संघाला आकर्षित करण्याचे आव्हान असेल.

२०१४ निवडणूकीत निश्चित मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केले गेले. पण सध्याची मोदी सरकारची कामगिरी पहाता त्यातील ४ ते ६ टक्के हिंदू मते इकडे तिकडे झाली तर त्याचा फटका २०१९ च्या निवडणूक भाजपलाच बसणार आहे. त्यामुळे ३०० पेक्षा जास्त जागांचे स्वप्न पहाणाऱ्या भाजपला १८० ते २०० जागा मिळू शकतील. याचाच अर्थ २०१९ च्या निवडणूकीत भाजपला स्वबळावर विजय मिळवता येणार नाही. निवडणूक जिंकायची असेल तर एकसंध एनडीएला निवडणूकीला सामोरे जावे लागेल. मात्र अशा वेळी शिवसेना, अकाली दल, जनता दल युनायटेड, तेलगू देसम पार्टी यांचे कार्यकर्ते किती एकसंध पणे भाजप बरोबर काम करतील या बाबत शंका आहे. शिवाय एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण हा प्रश्नही त्यावेळी उपस्थित होवू शकतो. सर्व मान्य नेताच पंतप्रधान पदाचा उमेदवार असावा अशी मागणी या मित्र पक्षांची होणार आहे. अशा वेळी मोदी आणि शहा यांची अडचण होवू शकते. मोदींनी पून्हा त्यांचे मित्रपक्ष किती प्रमाणात स्विकार करतील या बाबतही शंका आहे. त्यात सरकार जरी एनडीएचे असले तरी मोदी नामाचाच गजर अधिक होत आहे. यामुळे एनडीएचे मित्रपक्ष नाराज आहेत. शिवसेना त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा वेळी सर्वमान्य आणि अनुभवी नेता कोण असा प्रश्न पडतो. अशा वेळी सर्वात पहिले नाव समोर येते ते सुषमा स्वराज यांचे. सुषमा स्वराज ह्या सध्याच्या भाजप मधील सर्वात अनुभवी नेत्या आहेत. त्यांचे मित्रपक्षाच्या नेत्यां बरोबरही चांगले संबध आहे. शिवाय पक्षातही त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. या सुषमा स्वराज यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र त्या संघ परिवाराच्या पाहीजे तेवढ्या जवळ नाहीत. हीच बाब त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. पण त्यांनी संघ परिवारा बरोबरचे संबध आणखी दृढ केले तर त्याचा फायदा सुषमा स्वराज यांनाच होवू शकतो. शिवाय त्या मोदींना पर्याय ठरून पुढच्या पंतप्रधान निश्चितच होवू शकतात तेवढी क्षमताही त्यांच्यात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली

News Desk

महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर थोरात उपमुख्यमंत्री ?

News Desk

वेडा खेळ.. एकुलत्या एक मुलाचा घेतला बळी

News Desk