HW News Marathi
मुंबई

खरेदीविक्रीचा बाजार कुणी मांडलाय

मुंबई खरेदी विक्रीचा बाजार सध्या कुणी मांडला आहे हे सांगण्याची गरज नाही. ते सर्वाना माहीत आहे. अशा शब्दातशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. मनसेचे मुंबई महानगरपालिकेतील 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरुन शिवसेनेवर फोडाफोडीचा आरोप करण्यात येत आहे. शिवाय कोट्यवधी रूपयेही फोडाफोडीसाठी वापरले. या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उत्तर दिलं आहे.

सध्या बक्कळ पैसा कुणाकडे आहे आणि खरेदी-विक्रीचा बाजार कुणी मांडला आहे याचे खुलासे करायची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.

जे 6 नगरसेवक सेनेत आलेत ते स्वखुषीने आलेत. मराठी अस्मितेसाठी आलेत. पण भाजपच्या काही नेत्यांना ती खरेदी केल्याचे वाटते. ही मराठी आस्मितेचा अपमान असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. सेनेनं फोडाफोडीचे राजकारण केले नाही. येवढ्या खालच्या पातळीचे राजकारण सेना कधी करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संपादकीय मुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योजनांच्या लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी बँक खाते आधारशी जोडावे

News Desk

संविधान बदलू देणार नाही

News Desk

भाजपची मुंबईमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने

News Desk