HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनाही अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहेर हिला मंगळवारी (२८मे) संध्याकाळी पहिली अटक झाली. दरम्यान, या तिन्ही आरोपींना आज (२९ मे) मुंबई सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले. दरम्यान, सत्र न्यायालयाने ही तिन्ही आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती. या तिन्ही आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला होता. मात्र, या तिघीही फरार होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी मातोश्री बाहेर पडावं लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk

AIMIM चे खासदार इम्तियाज जलील ताफ्यासह चांदिवलीच्या सभेसाठी मुंबईत दाखल

News Desk

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात २५५२ पशुपालकांच्या खात्यावर ६.६७ कोटी रुपये जमा

Aprna