HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र सरकारनंतर आता राज्यानेही पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर केला कमी

मुंबई | केंद्र शासनाने शनिवारी (21 मे) पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने सुद्धा काल (रविवार 22 मे) पासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा- अजित पवार

News Desk

नांदेड महापालिकेत भ्रष्टाचार, प्रशांत पोपशेटवार यांचा आरोप

swarit

नांदेड महापालिका निवडणूकीत समृद्धी घोटाळ्याचे 300 कोटी भाजपने वापरले- नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

News Desk