HW News Marathi
क्रीडा

मुंबईकर शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट संघात निवड

जडेजा, आश्विन, उमेश यादवला वगळले

मुंबई – न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. यात मुंबईकर जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे रविंद्र जडेजा, आर. आश्विन , लोकेश राहुल, मोहम्मद शामी आणि उमेश यादव यांना वगळण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत विश्रांती दिलेल्या शिखर धवनचे या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकनेही या संघात स्थान पटकावले आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये 22, 25 आणि 29 ऑक्टोंबरला एक दिवसीय सामन्यांची मालिक रंगणार आहे.

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांडया, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेल्जियमने जर्मनीवर २-१ मात करत उपांत्य फेरीत दिली धडक

News Desk

महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश

News Desk

वेस्ट इंडिजला पुन्हा झटका

swarit