HW News Marathi
राजकारण

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाला कंठस्नान घालण्यात यश

जम्मू-काश्मीर | भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसा याला कंठस्नान घातले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराचे ४२ आरआर, एसओजी आणि सीआरपीएफने संयुक्तरित्या गुरुवारी (२३ मे) संध्याकाळी उशिरा त्राल परिसरातील दडसरा गावाबाहेर आतंकवादी असल्याची माहिती दिल्यानंतर या परिसराला घेराव घालून शोध मोहिमेला सुरुवात झाली.

“भारतीय लष्कराकडून या परिसरात अडकलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याऐवजी या दहशतवाद्यांनी ग्रेनेड टाकले, गोळ्या झाडायला सुरुवात केली. या दरम्यान झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या जवानांनी झाकिर मुसा या दहशतवाद्याला कंठस्नान घातले”, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. झाकीर मुसा हा हिज्ब कमांडर बुरहान वानीचा सहकारी होता आणि त्यानंतर त्याने आपले स्वतंत्र संघटन देखील तयार केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathaReservation : मराठा आरक्षण तातडीने रद्द करा !

News Desk

उध्दव, राज व आंबेडकर यांची निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरची मागणी

News Desk

जोपर्यंत काश्मीरमध्ये हिंदू राजा होता तोपर्यंत हिंदू-शीख सुरक्षित होते !

Gauri Tilekar