HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात जिल्हाध्यक्ष निवडीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

जळगाव | जळगावात भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. या बैठकीला सुरुवात होताच भुसावळ येथील भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी व्यासपीठासमोर येवून गोंधळ घातला. या अध्यक्ष निवडीच्या बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना काळे फासत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांना ही धक्काबुक्की करण्यात आली. यादरम्यान, व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भाजपचे जळगाव जिल्हा सरचिटणीस डॉ सुनील नेवे हे मनमानी कारभार करत असून भुसावळमधील जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन आपल्या मर्जीच्या कार्यकर्त्यांना खाते वाटत असल्याचा आरोप केला आहे. भुसावळ शहरात नुकत्याच झालेल्या शहराध्यक्ष निवडणुकीत खडसेंचे समर्थक असलेले सरचिटणीस सुनील नेवे यांनी मनमानी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले आणि त्यांच्या मर्जीतील दिनेश नेमाडे यांची निवड केली. जळगावात भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार इच्छुक आहेत.

दरम्यान, महाजन आणि दानवेंनी त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर रावसाहेब दानवे तिथून निघून गेले. काही वेळानंतर पुन्हा रावसाहेब दानवे यांचे बैठकी ठिकाणी आगमन झाले असून निवड प्रक्रिया बैठकीला पुन्हा सर्वात झाली आहे. बैठकीत झालेल्या हाणामारीनंतर काहीने दानवे हे बैठकीतून निघून गेले. यादरम्यान, जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. काही वेळानंतर पुन्हा रावसाहेब दानवे यांचे बैठकी ठिकाणी आगमन झाले असून निवड प्रक्रिया बैठकीला पुन्हा सर्वात झाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांना दिलासा! “मुंबईत ‘जम्बो कोविड’ सेंटरसाठी केंद्राकडून परवानगी”

News Desk

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, शरद पवारांनी केलं सेनेचं कौतुक

News Desk

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार, राज ठाकरेंना निमंत्रण नाही?

News Desk