HW News Marathi
क्राइम

उस्मानाबादची तरुणी पुण्यातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटमध्ये

पुणे- पुण्यातील सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांनी पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. यादरम्यान दोन मुलींना ताब्यात घेतले आहे. मुंबई, पुण्यासह विविध हायप्रोफाईल मुलींना मोठ्या पैशांचे अमिष दाखवून अवैध वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली असता वरील दोन मुली ताब्यात घेतल्या. या रॅकेटमधील विपुल नावाच्या एजंटला पोलिसांनी अटक केली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी नितीन तेलंगे यांना शिवाजीनगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलात विविध राज्यातील उच्चाभ्रू मुलींना मोठ्या रक्कमेचे व पैशांचे अमिष दाखवून वैश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. यात विपुल नावाचा एक एजंट आपल्या दलाल साथीदारांच्या देशभरातून मुली आणून पुण्यातील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलात सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. हा दलाल ग्राहकांना फोनद्वारे माहिती देऊन हॉटेल त्या ग्राहकांच्या नावे हॉटेल बुक करायचा व नंतर तेथे मुली पुरवायचा. या शाखेतील कर्मचारी नितीन तेलंगे यांना याची माहिती मिळताच त्यांच्या विभागाने सापळा रचला. पोलिसांनी ग्राहकांद्वारे खातरजमा करून घेतली आणि त्यानंतर छापा टाकला. त्यावेळी दोन मुली आढळून आल्या. या दोन्हीही मुली सध्या मुंबईत राहतात. त्यातील एक मूळची मध्य प्रदेशातील तर दुसरी उस्मानाबादमधील आहे. त्यांना ताब्यात घेऊन दलाल विपुल, कृष्णा सिंग ऊर्फ यादव, विरू ऊर्फ अजय यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुदखेडमध्ये पकडली गांजाची झाडे

News Desk

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Aprna

अकोला भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

News Desk