HW News Marathi
देश / विदेश

केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

वी दिल्ली: केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. मोठा गाजावाजा करून एखादी योजना लागु करायची. त्याचे यश-अपयश काय असेल याचा कुठलाही विचार न करता, त्याची जाहिरातबाजी करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केंद्र सरकारच्या अंगलट येत आहे. जीएसटी लागु करून फायदा होण्याऐवजी सर्वांचेच दिवाळे निघत असल्याचा चाहुल देशाचा कारभार हाकलणाºया अडीच लोकांना लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी अडीच लोकांनी तातडीची बैठक घेऊन जीएसटीमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना जीएसटी आयोगाला दिल्या. त्यानुसार तत्काळ २५ वस्तुंचे दर कमी करण्यात आले. आता या घटनेचेही पंतप्रधांनी भांडवल केले असून त्याचेही सिलिब्रेशन सुरू केले आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच देशात दिवाळी आल्याचे पंतप्रधांनी म्हटले आहे. परंतु जीएसटीमुळे लोकांचे दिवाळे निघाले, त्याचे काय, यावर मात्र सरकार काहीही बोलण्यास तयार नाही. दुसरी बाब म्हणजे येत्या दोन महिन्यात गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांमध्ये केंद्र सरकारच्या कारभारावर सोशल मीडियाद्वारे दिवसेंदिवस वाभाडे काढले जात आहेत. विकास पागल हो गया ट्रोलने थेट पंतप्रधानांवर हल्ला केला आहे. केंद्र सरकारलाही लोकांचा रोष वाढत चालल्याची जाणिव झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जीडीपी खालावल्याबद्दल काळजी करण्याची काहीच गरज नसल्याचे मोदींना सांगावे लागले. परंतु जीएसटीमुळे आर्थिक नुकसान झाल्याचे मान्य करतील, ते मोदी कसले.

गुजरात निवडणुकीत पाटीदार समाज सरकारविरोधात ठामपणे उभा आहे. भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते सावध झाले असून पाटीदार समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. गुजरातचा कणा व्यापारी आहे. जीएसटी लागु झाल्यानंतर गुजरातमधील कापड व्यापारी नागावला गेला आहे. त्याचा रोष वाढला आहे. त्यामुळे काल कापड उद्योगावरील जीएसटी पाच टक्क््ये खाली आणण्यात आली. एकूणच सरकारला आपल्या कारभारातील त्रुटीचे परिणाम जाणवू लागले आहे. सर्वसामान्य जणता मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत होता. परंतु जनतेची मोठी निराशा झाली आहे. त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसणार असल्याने अडीच लोक आतापासून सावध झाले आहेत. निवडणुकीनंतर सरकारच्या कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर उघडीस येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकचा सर्वेसर्वा झाला दुसऱ्यांदा झाला बाप.. मुलींला पत्रातून दिल्या शुभेच्छा

News Desk

महाभारतात कृष्ण सारथी होता, कोरोनाच्या युद्धात १३० कोटी महारथी आहेत

swarit

लॉकडाऊनंतर सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी काय करावे, पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना

News Desk