HW News Marathi
महाराष्ट्र

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई | मंत्रिमंडळ विस्ताराचा तीढा अजुन सुटत नव्हताच तितक्यात शिवसेनेला अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत धक्का दिला आहे. राजीनाम्याचे कारण हे कॅबिनेट पद न दिल्याचे सांगत अब्दुल सतार यांनी राज्यपालांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून येत मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले तर, औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच नाराजीने सतार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून, खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याचवेळी खोतकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी सत्तार यांचे फोनवरून बोलणे करून दिले असल्याचेही म्हटले जात आहे. “माझ्याकडे कोणताही राजीनामा आला नाही” अशी माहिती अनिल देसाई यांनी HW मराठीशी संवाद साधताना दिली. आता खोतकर सतार यांची मनधरणी करण्यात य़शस्वी होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल कंगना राणावतचे आदित्य ठाकरेंसाठी काही प्रश्न

News Desk

पुण्यात शिवसेनेनला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता !

News Desk

व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्मिकच्या 61 व्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद!

News Desk