HW News Marathi
महाराष्ट्र

देश सेवेसाठी लष्करात जाण्याचा दलित तरुणांना सल्ला – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

शिर्डी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केल्यामुळे लष्करात महार बटालियन ची स्थापना 1ऑक्टोबर 1941 रोजी झाली होती. त्यानिमित्त काल 1 ऑक्टोबर रोजी आपण दलित आदिवासिंसाठी लष्करात आरक्षण लागू करा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली . तेंव्हा देशसेवेसाठी लष्करात जाण्याचा; देशासाठी बलिदान देण्याची संधी लष्करात मिळत असल्याचे महत्व सांगताना बेरोजगार राहून व्यसनाधीन होऊ नका तर लष्करातील देशसेवेची नोकरी करून आयुष्य सत्कारणी लावा असा नव्यापिढीला सल्ला दिला .

मात्र त्या वक्तव्यात हातभट्टीचा झालेल्या उल्लेखाचा बातम्यांमध्ये विपर्यास्त करण्यात आला असून आपले तसे मत नसल्याचे स्पष्टीकरण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त. केला. शिर्डी येथे केबीज ग्रँड हॉटेल मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक झाली .त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी हा खुलासा केला .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चलो बारामती’ मोर्चा राजू शेट्टींना पडला महागात, बारामतीत शेट्टींसह ४० जणांवर गुन्हा दाखल

News Desk

MPSCExam : विद्यार्थ्यांच्या राहण्याचा सर्व खर्च सरकारने उचलावा,भाजप नेत्याची मागणी

News Desk

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत! – नाना पटोले

Aprna