HW News Marathi
महाराष्ट्र

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला,घरची परिस्थिती हलाखीची असतानाही बँकेची परीक्षा पास झाली, डेंग्यूने तरुणीचा जीव घेतला.:

मुंबई : घरची परिस्थिती हलाखीची असताना. अशा परिस्थितीतही तिने हार मानली नाही. ती उच्चशिक्षण घेतले. काही दिवसापूर्वी ती बँकेची परीक्षा पास झाली. येत्या ९ तारखेला बेंगळुरू येथील बँक ऑफ बडोदा येथे पीओ म्हणून जॉईन करणार होती. डेंग्यूने या होतकरू तरुणीला हिरावून घेतले. परिस्थितीला नमवणा-या या तरुणीला मृत्यूला मात्र हरवता आले नाही.डॉली मच्छिंद्र इंदूरकर (२५) रा. इंदोरा मॉडेल टाऊन असे या तरुणीचे नाव. वडील मच्छिंद्र यांचा फुले विकण्याचा व्यवसाय होता. दहा वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आई कुमुद आणि लहान बहीण अंकिता एकटे पडले. आईने हिंमत हारली नाही. ती रुग्णालयात काम करून मुलींचा सांभाळ करू लागली. मुलींनीही त्यांना साथ दिली.

परिस्थितीशी समर्थपणे तोंड देत दोन्ही बहिणी चांगल्या शिकल्या. एमबीए झाल्या. अंकिता एका खासगी कंपनीत काम करते. डॉलीसुद्धा काम करून शिकत होती. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारीही करीत होती. काही दिवसांपासून तिने पूर्णपणे बँकेच्या परीक्षेसाठी लक्ष केंद्रित केले होते वैशालीनगर येथे क्लासेसही तिने जॉईन केले होते. १८ सप्टेंबर रोजी परीक्षेचा निकाल आला. डॉलीने ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती खूप आनंदात होती. शिकवणी वर्गातून ती टॉपर होती. त्यामुळे तिचा विशेष सत्कारही करण्यात आला होता. ती खूप खूष होती. यावेळी आपले मनोगतही तिने व्यक्त केले होते. सत्कारात मिळालेले स्मृतिचिन्ह घेऊन ती घरी आली तेव्हा शेजारच्या मुलामुलींनी तिला गराडा घातला होता. येत्या ९ ऑक्टोबर रोजी डॉली बेंगळुरू येथे बँक ऑफ बडोदामध्ये पीओ म्हणून रुजू होणार होती. गेल्या सोमवारी तिची वैद्यकीय चाचणी झाली. त्यात ती फिट असल्याचे प्रमाणपत्रही मिळाले. मंगळवारी सायंकाळी अचानक तिला ताप आला. एका खासगी नर्सिंग होममध्ये तिला भरती करण्यात आले. तेव्हा तिला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले. तिच्यावर उपचार सुरू होता. परंतु प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत होती. रविवारी रात्री तिला धंताली येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी सायंकाळी डॉलीची प्राणज्योत मालवली. एका संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंदोलनकर्त्यांनी सांगलीत थेट गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडला 

News Desk

सर्कशीत आधी प्राणी होते आता जोकर आहेत, विदूषकाच्या विधानावर फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

News Desk

नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका- मुख्यमंत्री 

News Desk