HW News Marathi
महाराष्ट्र

समर्थकांच्या पुणे काँग्रेस भवनाच्या तोडफोडीवर थोपटेंनीची प्रतिक्रिया

पुणे। ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी (३० डिसेंबर) होऊन २४ तास पूर्ण होत असताना मंत्रिपद न मिळालेल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी काल (३१ डिसेंबर) पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड तोडफोड केली. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणा दिल्या होत्या. या संपूर्ण प्रकारावर आता थोपटेंनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, “या प्रकाराची मलाही माहिती नव्हती, काँग्रेस हा अहिंसेच्या मार्गाने जाणारा पक्ष आहे. त्यामुळे झालेला प्रकार चुकीचा आहे, असं ते म्हणाले आहेत. तसेच मी तीन वेळ आमदार झालो आहे, त्यामुळे मंत्रिपद मिळावे अशी माझी इच्छा होती, पण झालेला उद्रेक बरोबर नाही, असे थोपटे म्हणाले आहेत,” असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

‘भोर-वेल्हा- मुळशी’ असा विस्तीर्ण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटेंच्या समर्थकांना त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी काल भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. काँग्रेसचे समर्थकांनी भोर नगरपालिकेच्या सर्व २० नगरसेवकांसह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली होती. मात्र, इतक्यावरच न थांबता काल संध्याकाळी ६ च्या सुमारास ४० ते ५० कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा! – चंद्रकांत पाटील

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या ‘पुन:श्च हरीओम’, ‘मिशिन बिगिन अगेन’ घोषणामुळे गोंधळ वाढला। देवेंद्र फडणवीस

News Desk

नूतन इमारतीच्या माध्यमातून ग्रामीण माणसाच्या अपेक्षांची पूर्ती व समाधान व्हावे! – धनंजय मुंडे

Aprna