HW News Marathi
महाराष्ट्र

शुट आउट अ‍ॅंड हिमायतबाग: आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी

औरंगाबाद- हिमायतबाग परिसरात २०१२ साली एटीएस पथकाने केलेल्या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या दोन आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली. मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ इस्माईल अब्दुल बाबुखाँ (३२, रा. चंदननगर, इंदौर, मध्य प्रदेश) व आरोपी मोहम्मद शाखेर हुसेन उर्फ खलील अखिल खिलजी (२०, रा. खंडवा, मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. तर इतर दोन आरोपींना सबळ पुराव्याअभावी मुक्त केले.

विशेष म्हणजे या प्रकरणी ११ सप्टेंबर २०१७ रोजी कोर्टात सुनावणी सुरू झाली व २७ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली; म्हणजेच अवघ्या १६ दिवसांत सुनावणी पूर्ण झाली आणि सहाव्या दिवशी कोर्टान शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यात पकडलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध ‘खुनाचा प्रयत्न केल्याचा’ गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील चार आरोपींना सुनावणीसाठी वेगवेगळ्या कारागृहातून औरंगाबादच्या जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्यापैकी काहींचे ‘इन कॅमेर’जबाबही नोंदविण्यात आले होते.

२६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र आरोपींना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीनधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. या वेळी आरोपींनी एटीएस पथकावर गोळया झाडण्यास सुरुवात केली होती. यात पोलिस हवालदार शेख आरेफ यांना गोळी लागली होती. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दहशतवादी अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला होता, तर दहशवादी मोहम्मद शाकेरच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. या प्रसंगी पाठलाग करून एटीएसने आरोपी अबरार यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्य प्रदेश) याला अटक केली होती. आरोपींकडून ४ गावठी कट्टे, २ रिव्हॉल्व्हर, १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध विशेष कोर्टात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती!

News Desk

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk

छगन भुजबळांवर शिवसेनेची बॅनरमधून जहरी टीका

News Desk