HW News Marathi
मुंबई

अवघ्या चार मिनिटांत २२ जणांचा बळी

मुंबई: सकाळी कार्यालयात पोहोचण्याची वेळ झालेली. परंतु पावसाचा जोर कमी होत नव्हता. आडोशासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ओव्हरब्रिज हाच पर्याय शिल्लक. अशात चार लोकलमधील हजारो प्रवाशांची गर्दी आली. मागे-पुढे जाण्यासाठी इंचभर जागा शिल्लक नसल्याने सहाजिक रेटारेटी झाली. त्यात सहा फूट अरूंद पुलावरून काहीजण एकमेकांच्या अंगावर पडेल. तिथेच मोठा अनर्थ झाला.

काहीतरी घातपात झाल्याची अफवा उठली जो-तो वाट मिळेत त्या दिशेने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. कोणी एकमेकांच्या अंगावरून उड्या मारून बाहेर पडत होते तर कोणी छताला लटकले होते. या गदारोळात काहींचा दम कोंडला. क्षणार्धात २२ जणांचे प्राण गेले.एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील हा थरारक प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या रेल्वे स्टेशनवर गर्दी नित्याचीच परंतु पावसामुळे गर्दी वाढत गेली. त्यातून हा अपघात झाला. अनेकजण या धक्काने भयभीत झाले आहे. शेजारील नागरिकदेखील किंचाळ्या ऐकून हदरून गेले. अवघ्या चार मिनिटात होत्याचे नव्हते झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरपीआय नगराध्यक्षाने केली पोलीस कर्मचा-याला मारहाण

News Desk

शरद पवारांविषयी केलेलं ते वक्तव्य संजय राऊतांना भोवलं,राऊत शिवसेनेत आहेत का राष्ट्रवादीमध्ये ?कॉंग्रेसचा सवाल

News Desk

एअरटेलतर्फे आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या वेळेआधी डिलिव्हरीला सुरुवात 

News Desk
मुंबई

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जवळपास 30 लोकं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे.

Related posts

ऑफिस मध्ये डेस्क योगा

swarit

विवाहितेला ब्लॅकमेल करणारा गजाआड

News Desk

कॉपी तपासण्याच्या नियमात बदल | तावडे

News Desk