HW News Marathi
मुंबई

मृतदेहाच्या अंगावरील सोनेही चोरले

मुंबई : एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन परिसरातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. या घटनेवेळी अनेकजण देवदुतासारखे धावून आल्याने काहींचे प्राण वाचले. त्यांच्या माणुसकीला सर्वांना सलाम केला. परंतु याच गर्दीत काहींनी हात धुवून घेण्याचे काम केले. मृत्यूमुखी पडलेल्या एका महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काहींनी चोरल्याचे फुटेज लीक झाले आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे.

शुक्रवारी एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कांजुरमार्गच्या रहिवासी सुभलता शेट्टी यांच्या मृतदेहावरुन सोन्याचे दागिने काही नालायकांनी काढून घेतले. नातेवाईकांनी शुभलता यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दुर्घटनेनंतर समोर आलेल्या काही फोटोंमध्ये एक तरुण सुमलता यांच्या हातातील बांगड्या काढून घेताना दिसत आहे. “पोलिसांकडून आम्हाला फक्त मोबाईल मिळाला. फोटोत त्यांच्या हातात दिसणाऱ्या बांगड्या मिळाल्या नाहीत,” अशी माहिती शुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट, माहुल गाव हादरले

swarit

डॉ. आंबेडकर स्मारकाचा खर्च १६६ कोटींनी वाढला

News Desk

Mumbai Dongri Building Collapsed : मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत !

News Desk