HW News Marathi
व्हिडीओ

Aditya Thackeray And Ajit Pawar | आदित्य ठाकरे कॅबिनेटमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री..

शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नावही मंत्रिमंडळात निश्चित मानलं जात आहे. आज शपथविधी घेणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची यादी तयार झाली आहे. त्यात आदित्य यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे आदित्य यांना कोणते मंत्रिपद मिळतं याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, एकाच घरात दोन मंत्रिपदे देण्यात आल्याच्या शक्यतेमुळे शिवसेना नेते नाराज असल्याचीही चर्चा आहे. राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी लवकरच आज दुपारी 1 वाजताच्या मुहुर्तावर होत आहे. त्यामध्ये काँग्रेसचे 10 आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली आहे. अजित पवार समर्थक आमदारांनी अजित पवार यांच्यासाठी लॉबिंग केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.#AjitPawar #AdityaThackeray #MaharashtraCabinetExpansion #UddhavThackeray #SharadPawar #NCP #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार: ‘MPSCच्या रिक्त जागा 31 जुलै 2021 पर्यंत भरणार’

News Desk

“निकालानंतर माझा बाप आठवेल” म्हणणाऱ्या Rohit R R Patil यांचा शब्द खरा ठरला;विरोधकांना धूळ चारली

News Desk

आमच्या अयोध्या यात्रेमुळे जे झोपले होते त्यांचे डोळे उघडले

News Desk