HW News Marathi
राजकारण

एक्झिट पोलचा परिणाम, शेअर बाजारात तेजी

मुंबई | देशात लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडताच रविवारी संध्याकाळी (१९ मे) विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिट पोल्सनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारलाच बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या एक्झिट पोल्सचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. आज (२० मे) आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार २.४९% टक्क्यांनी वाढला आहे.

शेअर बाजारात सेन्सेक्स ८०२ अंकानी वाढला. तर निफ्टीतही २२९ अंकांची वाढ दिसून आली. सोमवारी सकाळी बाजार खुलला तेव्हा शेअर बाजाराची सुरवात तेजीतच झाल्याची पाहायला मिळाली. शेअर बाजारात ८०२ अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स ३८,८१९.६८ अंकांवर उघडला. तर निफ्टीतही २२९ अंकांची वाढ होऊन ११,६९१.३० अंकांवर उघडला.

रविवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. बॉम्बे स्टॉक एक्सेंज ९४६ अंकांनी वधारून ३८,८७७.०१ वर सुरू झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्येही २४७ अकांनी वाढून ११, ६५१. ९० वर सुरु झाला. शुक्रवारी सेंसेक्स ३७,९३०.७७ वर बंद झाला होता, निफ्टी ११, ४०७.१५ वर बंद झाला होता. एक्झिट पोलमधील अंदाज सत्यात उतरल्यास बारारात तेजी दिसून येईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उध्दव ठाकरेंना अयोध्येत होतोय विरोध 

News Desk

राजनाथ सिंग यांनी केला केजरीवाल यांना फोन

News Desk

इतक्या वर्षांनंतरही हिंदुस्थानला ‘ऍट्रॉसिटी’ कायद्याची गरज भासते ही शोकांतिका | उद्धव ठाकरे

News Desk