HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देणारा मी कोण ?

नवी दिल्ली | “पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देणारा मी कोण ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतांच्या रूपात वाराणसीच्या जनतेने आशीर्वाद दिले आहेत”, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात वाराणसी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मुरली मनोहर जोशी यांनी मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे.

“नरेंद्र मोदी हे भाजपचे वाराणसी मतदारसंघाचे उमेदवार आहेत. जनतेने मोदींना मतांच्या रूपात आशीर्वाद दिले आहेत. मी त्यांना आशीर्वाद देणार कोण आहे ?”, असे मुरली मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुरली मनोहर जोशी यांनी २६ मार्च रोजी स्वतः असे जाहीर केले होते की, “भाजपने त्यांना आगामी लोकसभा निवडणुका लढविण्यास नकार दिला आहे”.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांची जागा मोदींनी घेतली होती. त्यामुळे मुरली मनोहर जोशी यांनी कानपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या श्रीप्रकाश जयस्वाल यांचा २ लाखांहुनही अधिक मतांनी पराभव केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशात मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून तक्रार

News Desk

‘मन की बात’ मधून मोदींनी साधला भारतीयांशी संवाद

News Desk

शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर केल्या ‘या’ तीन महत्वाच्या घोषणा

Aprna