HW News Marathi
राजकारण

केदारनाथशी माझे वेगळे नाते !

रुद्रप्रयाग | लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय उत्तराखंडच्या दौऱ्यावर गेले. या दौऱ्यादरम्यान मोदींनी कल (१८ मे) केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक केल्यानंतर गुहेत ध्यानसाधना करण्यासाठी गेले होते. मोदी आज (१९ मे) सकाळी गुहेतून बाहेर येऊन प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केदारनाथशी माझे वेगळे नाते, असे मोदी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“यावेळी मोदी यांनी माझे केदारनाथशी वेगळे नाते आहे. इथल्‍या २०१३ मधील नैसर्गिक आपत्‍तीनंर मी इथल्‍या मंदिर आणि परिसराच्या विकासाच्या दृष्‍टीने एक मास्‍टर प्लान बनवला आहे. त्‍यादृष्‍टीने विकासाचे काम सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मी इथल्‍या विकासकामांचा आढावा घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याचबरोबर त्‍यांनी यावेळी निवडणूक आयोग आणि प्रसारमाध्यमांचेही आभार मानले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्‍यांनी आपण केदारनाथाकडे काहीही मागितले नसल्‍याचे सांगितले.” मोदींनी आज बद्रीनाथाचे येथे जावून दर्शन घेत विशेष पूजा केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली विखेंची पाठराखण

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : आता दररोज एक एक घराणे भाजपमध्ये येईल !

News Desk

पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करणे हा आमचा विचारच नाही !

News Desk