HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहे. आंबेडकर आणि ठाकरे या दोघांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, कोरेगाव भीमामधील शौर्य दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती मिळली आहे. यामध्ये कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा या ठिकाणी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जाते. त्याचा आढावा घेण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला हवे तितके यश मिळाले नाही. मात्र, बड्या पक्षांना तगडी टक्कर दिली आहे.

मिलिंद एकबोटे-संभाजी भिडेंना पुणे जिल्हाबंदी

कोरेगाव भीमामधील शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि हिंदु एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली. भिडे आणि एकबोटे यांना २८ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पुणे जिल्हाबंदी घालण्यात आली आहे. १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक कोरेगाव-भीमा या ठिकाणी येत असतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा, या पार्श्वभूमीवर नियोजन जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित

Aprna

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

‘मराठा’ विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच पाहिजे !

News Desk