HW News Marathi
राजकारण

इंदिरा गांधींसारखीच खाजगी सुरक्षा रक्षकाकडून माझीही हत्या होईल !

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (१८ मे) एका मुलाखतीत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारखीच माझ्या खाजगी सुरक्षा रक्षकाकडून माझीही हत्या होईल”, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. माझे सुरक्षा रक्षक देखील भाजपला समर्थन देतात. भाजप हा माझ्या जीवावर उठला आहे. भाजपकडून माझी हत्या केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

“माझे सुरक्षा रक्षक हे भाजपला पाठिंबा देतात. भाजप पक्ष माझ्या जीवावर उठला आहे. भाजपकडून माझी हत्या केली जाईल. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारखीच माझ्या खाजगी सुरक्षा रक्षकांकडूनच माझी हत्या होईल अशी भीती आहे”, असा दावा केजरीवाल यांनी या मुलाखतीत केला आहे.

दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पक्षच विजयी होईल अशी आशा होती. मात्र, आता आयत्या वेळी डाव पलटला आहे. अगदी शेवटच्या क्षणी ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा दावा देखील अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी केला होता. त्याचप्रमाणे, दिल्लीतील मुस्लिम मते काँग्रेसला कशी गेली ?याचाच शोध आम्ही घेत असल्याचे देखील केजरीवाल यांनी यावेळी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार !

News Desk

संपूर्ण देशाला माहिती आहे कि देशाचा चौकीदार चोर आहे !

News Desk

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खरगे विरूद्ध थरूर; उद्या होणार मतदान

Darrell Miranda