HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा व्हॉट्अ‍ॅप नंबर जाहीर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजची प्रचंड चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ही उत्सुकता आज संपुष्टात आली आहे. त्आंटे फेसबूक पेज सुरू झाले. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात एका सोहळ्यात राज ठाकरे यांच्या ‘फेसबुक पेज’चे अनावरण करण्यात आले. व्यंगचित्र, कामे, मते, धोरणं आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी आपण या फेसबुक पेजचा वापर करणार असल्याचे राज यांनी यावेळी सांगितले. तसेच राज ठाकरेंनी इतक्या उशिरा फेसबुकवर का, या प्रश्नाचीही उत्तरे दिली. राज ठाकरे यांनी फेसबुक पेज लॉन्च केले. सोबतच हॉट्सअ‍ॅप क्रमांकही जाहीर केला आहे. 76666 62673 असा हा क्रमांक असेल. यावर आपले कार्यकर्ते संवाद साधू शकतात, असेही राज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तासाभरात राज यांनी पाच लाख लोकांनी लाइक्स केले.

राज ठाकरे यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला स्वत:हून भारतात यायचे आहे. तो अंपग झाला असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी मुंबईत केला आहे. दाऊदला स्वत:ला भारतात यायचे आहे, त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु असल्याचे ही राज म्हणाले.

नारायण राणेंवर उपरोधक टीका..

राज यांनी या कार्यक्रमात नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख न करता चांगलाच समाचार घेतला आहे. राज म्हणाले फेसबुकवर योगा झाला, स्वच्छ भारत अभियान झाले, आता काय तर फुटबॉल आला आहे. भारत स्वच्छ झाला पाहिजे, त्याआधी केंद्र, राज्य सरकार, मंत्रालय आणि महापालिका स्वच्छ करा. भाजपने फुटबॉल वाटले आणि काँग्रेसने सिंधुदुर्गात लाथ मारली, आता दोन्ही गोली म्हणतात तो बॉल माझ्याकडे नको, अशा शब्दात राज ठाकरेंची नारायण राणेंवर उपरोधक टीका केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन

News Desk

मराठा समाजाला आरक्षण तरी द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या

News Desk

Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा

News Desk