HW News Marathi
मुंबई

चहा पिताना धक्का लागल्यामुळे पुण्यात तरुणाचा खून

पुणे : चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली. पुण्यातील बाणेरमध्ये सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बाणेर रोडवरील सकाळनगर बसस्टॉप जवळ दोन तरुण टपरीवर चहा पित होते. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या एकाला त्यांचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर त्या तरुणाने दोघांवर कुकरीने वार केले. हल्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघंही तरुणी इंदिरा वसाहत परिसरात राहत होते. घटनेनंतर आरोपी हल्लेखोर पसार झाला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील गारवा होणार १५ दिवसांसाठी गायब 

News Desk

नेदरलँडची राणी मॅक्झीमा डबेवाल्यांच्या भेटीला

News Desk

राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी

News Desk