HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या भेटीचे वेगळे अर्थ काढू नका !

मुंबई | मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका, असे वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नागपुरात आल्यानंतर केले आहे. खडसे पुढे म्हणाले की, कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, असे म्हणत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

खडसेंना नागपूरात येण्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्नविचारल्यावर ते म्हणाले की, “मी माझ्या विधानभवनात कामानिमित्ताने आलो आहे. तसेच मी नागपुरात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही. माझे मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही. मी निर्णय घेतला असता तर वरिष्ठांवर मन वळवण्याचा प्रसंग आला असता. मी वरिष्ठांसोबत कायम संपर्कात असतो,” असेही खडसेंनी स्पष्टीकरण दिलेले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून खडसे पक्षावर नाराज असून त्यांनी वेळोवेळी पक्षविरोधात भूमिका घेतली आहे. खडसेंनी १२ डिसेंबरला परळीतील गोपीनाथ गडावर त्यांनी भाजपच्या नेतृत्त्वावर आणि थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. ‘पंकजाताई पक्ष सोडणार नाही पण आता माझा काही भरवसा धरु नका’ असे म्हणत खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. खडसे हे खान्देशातील मोठे राजकीय नेते आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले त्या माणसाबद्दल बोलायला नको, निलेश राणेंचा प्रहार

News Desk

मराठा आंदोलक आक्रमक, ‘महाराष्ट्र बंद’ची दिली हाक

News Desk

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

News Desk