HW News Marathi
मुंबई

मुंबई म्हाडाच्या घराची लॉटरी

मुंबई : म्हाडातर्फे मुंबईतील ८१९ सदनिकांची १० नोव्हेंबरला सोडत निघणार आहे, याविषयी शुक्रवारी सविस्तर जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित होणार आहे. अर्जदारांना १६ सप्टेंबरपासून आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वांचे लक्ष लागून असते, अल्प, उच्च, अत्यल्प उत्पन्न गट यांच्यासाठी ही जाहिरात आहे, पवई, गोरेगाव, सायन, लोअर परळ या ठिकाणी ही घर आहेत. दरवर्षी म्हाडाची जाहिरात प्रकाशित होते, मात्र, यावेळी ही जाहिरात उशीराने प्रकाशित झाली आहे, दरवर्षी ही जाहिरात जून जुलै महिन्यात प्रकाशित होत होती. म्हाडाच्या घरांच्या किंमती वाढल्या असल्याच्या तक्रारी दरवर्षी असतात, मात्र, यावेळेस म्हाडाने घराच्या किंमती कशा ठेवल्या आहेत, हे अजून समजू शकलेले नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk

मुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर!

News Desk

मध्यावधी निवडणुका झाल्या तरीही विजय आमचाच – अमित शहा

News Desk