नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी संपण्यापूर्वीच निवडणू आयोगाने एक दिवसाआधीच आचारसंहिता लागू करण्यात आली. बंगालमध्ये शुक्रवारी (१७ मे) रोजीऐवजी गुरुवारी (१६ मे) रात्री दहानंतर ते लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही पक्षाला प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगालमध्ये झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.
Election Commission: No election campaigning to be held in 9 parliamentary constituencies of West Bengal – Dum Dum, Barasat, Basirhat, Jaynagar, Mathurapur, Jadavpur, Diamond Harbour, South and North Kolkata from 10 pm tomorrow till the conclusion of polls. pic.twitter.com/cTpKS6jFwp
— ANI (@ANI) May 15, 2019
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये काल (१४ मे) भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठा हिंसाचार झाला. रोड शोदरम्यान अमित शहा उभे असलेल्या ट्रकवर काठ्या फेकण्यात आल्या. तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.