HW News Marathi
राजकारण

छे..छे..झुकली रे झुकली, आशिष शेलारांचा शिवसेनेवर जोरदार निशाणा

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (१४ डिसेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर वीर सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आता देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. त्याचप्रमाणे, केवळ राहुल गांधी नव्हे तर राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. भाजपकडून या मुद्द्यावरून आता काँग्रेससह शिवसेनेला देखील चांगलेच लक्ष्य केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली खार रेल्वे स्टेशनजवळ सावरकरप्रेंमींकडून आंदोलन करण्यात आले आहे. “मी सावरकर…आम्ही सगळे सावरकर..असा संदेश देत आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी”, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आशिष शेलार यांनी यावेळी कवितेतून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटरवर एक कविता पोस्ट करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “नाही धार “सच्चाई”कारांच्या शब्दांना आज दिसली, “रोखठोक” लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली. सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना, सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!”, अशी कविता आशिष शेलार यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

“अटलजींच्या शब्दात सांगायचे तर..सावरकर म्हणजे तेज…सावरकर म्हणजे त्याग..सावकर म्हणजे तितिक्षा..सावरकर म्हणजे तिखट. राहुलबाबा, एकार्थाने बरंच झाले तुमचं आडनाव सावरकर नाही…नाहीतर हे सगळे शब्द बदनाम झाले असते राहुलबाबा”, असेही ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेकडून देखील तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राहुल गांधी यांनी याबाबतचा इशारा देखील दिला आहे. मात्र, “शिवसेनेची ही भूमिका सौदेबाजीची आहे. केवळ सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेकडून अशी मवाळ भूमिका घेण्यात येत आहे. शिवसेना काँग्रेससमोर लाचारी पत्करत आहे”, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केवळ सत्तेसाठी नव्हे तर ही विचाराने केलेली युती आहे !

News Desk

संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे

News Desk

काँग्रेसचा राजीनामा देण्याचा माझा कोणताही विचार नाही | प्रताप गौडा पाटील

News Desk