HW News Marathi
मुंबई

लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी बायकांची हाणामारी

मुंबई- लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी मुंबईकरांची चोविस तास स्पर्धा सुरू असते. काही ग्रुप जागा धरून इतरांची कोंडी करतात. यातून अनेकदाचा हाणामारीच्या घटना घडलेल्या आहेत. पुरूषांमध्ये दररोज हाणामाऱ्या होण्याच्या घटना रूटीन असताना आता महिलादेखील यात मागे नाहीत. कल्याण लोकमध्ये जागा मिळवण्यासाठी बायकांनी हाणामारी केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला.कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी आधीच जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी एका महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. महिलेला झालेल्या या मारहाणी संदर्भात पोलिसांना काहीही माहीत नसल्याने कुठलीही तक्रार नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

डोंबिवलीच्या चारुशीला वेल्हाळ या महिला रेल्वे प्रवाशाला कल्याणच्या महिलांनी मारहाण करत जागा सोडण्यासाठी धक्काबुकी केली. त्याची तक्रार मुंबईत रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस दलाकडे करण्याचे काम सध्या सुरू आहे. सुरेखा माने या प्रत्यक्ष दर्शी महिला प्रवाशाने ही माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ला एस.टी. आगारामध्ये ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलन

News Desk

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk