अमरावती | राज्यात दुष्काळाच्या झळा बसत असल्याने पाण्याचे योग्य पद्धतीन नियोजन करणे गरजेचे आहे. तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे अप्पर वर्धा धरणातील पाणी वर्धा नदीपात्रात सोडावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते, मात्र तरीही जलसंपदा विभागाने पाणी रोखल्याचा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा आहे. अमरावतीतील बैठकीदरम्यान काल (१३ मे) जलसंपदा विभागचे अधिकारी रवींद्र लांडेकर यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या ओडिओमध्ये बैठकीत अधिकाऱ्यांकडे कागद भिरकावण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
Yashomati Thakur, Congress MLA from Teosa: Authorities were supposed to release water but didn't, so we had to become aggressive. We've been demanding release of water since last 2 weeks, Collector had also ordered release of water from Upper Wardha but BJP MLA intervened. (13.5) pic.twitter.com/0MT1W9uCem
— ANI (@ANI) May 14, 2019
अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यावरुन अमरावती जिल्हात काँग्रेस भाजपत खडा जंगी झाली. ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात पाणी सोडण्याच्या श्रेयावरुन भाजपने आडकाठी करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. ठाकूर यांना श्रेय जाऊ नये म्हणून मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. बोंडे यांच्या दबावामुळेच अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याला स्थगिती दिली होती, असे ठाकूर वाटते. अखेर ठाकूर यांच्या आंदोलनानंतर अप्पर वर्धा धरणाचे पाणी आज (१४ मे) सोडण्यात आले. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.