HW News Marathi
महाराष्ट्र

राहुलची सभा संपताच मंडप कोसळला

कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला. या दौऱ्यांत त्यांनी परभणी येथे सभा घेतली. सभेत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका टिपन्नी केली. काही वेळात भाषण संपून राहुल गांधी निघुन गेले. त्यानंतर काही क्षणात या परिसरात जोरदार वादळीवारे व पाऊस दाखल झाला. त्यात राहुलसाठी उभारण्यात आलेला मंडप व व्यासपीठ पत्त्याच्या इमारतीसारखे कोसळून पडले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. परंतु राहुल यांचे भाषण सुरू असताना हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. विशेष म्हणजे राहुल यांच्या सभेसाठी दिल्लीहून आलेल्या विशेष पथकाने या मंडपाची पाहणी केली होती. पावसाचा धोका लक्षात घेऊन मजबूत मंडप उभारण्यात आला होता. तरी तो कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकूणच राहुल गांधीच्या सुरक्षेचा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला असता. परंतु स्थानिक कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे जाणवते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का!

News Desk

कोचिंग क्लास पुन्हा सुरू करण्यासाठी शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार

News Desk

भाजप मंत्र्यांच्या वागणूकीचे कार्यकर्त्यानेच सोशल मिडियावर  काढले वाभाडे

News Desk