HW News Marathi
मुंबई

डॉक्टरावर कोयत्याने हल्ला

पुणे- एका स्त्रीरोगतज्ज्ञावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यासारख्य़ा प्रगत शहरात घडला आहे. पुण्याच्या पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल बिडकर यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामागचे कारण मात्र चक्रावून सोडणारे आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे एक जोडपे डॉक्टरांकडे बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यासाठी आले होते. डॉक्टरने तपासणी केल्‍यानंतर गर्भ १६ महिन्यांचा असल्‍याचे त्‍यांच्या लक्षात आले. १२ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा गर्भ असल्यास केवळ ठराविक केसमध्येच गर्भपात करण्यास परवानगी असते. त्यासाठी डॉक्टरांची पूर्व परवानगी असणेही आवश्यक असते. मात्र संबंधित तरुणीकडे तशाप्रकारची कोणतीही परवानगी नसल्याने डॉ. बिडकर या तरूणीचा गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर पाच दिवसांपूर्वी तरुणाने फोन करून गर्भपात करण्यासाठी बिडकर यांना धमकी दिली होती. त्‍यावेळीही डॉ. बिडकर यांनी गर्भपात करता येणार नसल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे चिडलेल्‍या तरूणाने शनिवारी रात्री पाच ते सहा जणांसह रूग्णालयात येऊन डॉक्टरवर कोयत्याने वार केले. या हल्‍ल्‍यात डॉ. बिडकर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, उपचारानंतर आता त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. या घटनेचा पुण्यातील डॉक्टरांच्या संघटनेने निषेध केला असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेहरूनगर येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी! – मंगलप्रभात लोढा

Aprna

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहवे – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

News Desk

तळोजातील टायर गोदामाला भीषण आग

News Desk