HW News Marathi
देश / विदेश

जेएनयुमध्ये डाव्या संघटनांचा विजय

नवी दिल्ली – जेएनयु अर्थात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत युनायटेड लेफ्टने चारही जागा जिंकल्या आहेत. युनायटेड लेफ्टच्या गीता कुमारी हिने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. तिच्याशिवाय इतर तीन जागा देखील डाव्या संघटनांनीच जिंकल्या. गीता कुमारी ही एआयएसए या विद्यार्थी संघटनेकडून निवडणूक लढवत होती.

तीनही डाव्या संघटनांनी यावर्षी एकत्र निवडणूक लढवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने युनायटेड लेफ्टला सर्व जागांवर कडवी टक्कर दिली, पण त्यांचा दारूण पराभव झाला. विद्यार्थी परिषदेकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारी उमेदवार निधी त्रिपाठी दुस-या क्रमांकावर राहिली. दुसरीकडे कॉंग्रेसची एनएसयूआय संघटनेला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेरच्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपच्या मदतीला यशवंत सिन्हा

swarit

भीमा-कोरेगाव हिंसाचार, अटकेतील पाच कार्यकर्ते नक्षली संघटनेचे सदस्य

News Desk

न्यायमूर्ती रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

swarit