HW News Marathi
महाराष्ट्र

मला कोअर कमिटीतून बाहेर काढले !

मुंबई | भाजप जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट पुन्हा एकदा सदिच्छा भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळपास दोन ते अडीच तास चर्चा झाली होती. या भेटीनंतर खडसेंना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटले की, मी कोअर कमिटीमध्ये होते. मात्र, मला सध्या कोअर कमिटीच्या बैठकांना आमंत्रण देखील येत नाही. मला कोअर कमिटीतून बाहेर काढले असेल, अशी माहिती खडसेंनी पत्रकारांना दिली.

एकनाथ खडसे म्हणाले, “गोपीनाथ गडावर शक्तीप्रदर्शन करण्याची आवश्यकताच नसते. कारण दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे मुंडे अनुयायी येतात. गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे मोठे नेते होते. त्यांनी सर्वांना मान्य असणारे नेतृत्व केले आहे. म्हणूनच त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक येथे येतात. येथे राजकीय चर्चा होणार नाही. स्वतः गोपीनाथ मुंडे देखील भगवान गडावरील कार्यक्रमात राजकीय चर्चा करु नये, असे सांगायचे.”

एकनाथ खडसे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेटनंतर मी तुम्हाला सांगेन, असे सूचक विधान केले आहे. खडसे पुढे म्हणाले की, “विनोद तावडेंना माझी मनधरणी करण्याची जबाबदारी दिली आहे की नाही याविषयी मला माहिती नाही. मात्र, मी आजही पक्षातच असल्याने मनधरणी करण्याची गरज नाही. मी पूर्वीही पक्षात होतो, पक्षाचे नेतृत्व केले आहे. पण कुणाची मनधरणी करण्यासाठी कुणाची नेमणूक करावी, अशी प्रथा भाजपमध्ये याआधी तरी नव्हती. आता नव्याने काही निर्माण झाले असेल, तर माहिती नाही.”

गोपीनाथ गडावर दिग्गज नेत्यांची उपस्थिती

पंकजा मुंडे दरवर्षीच गोपीनाथ गडावर कार्यक्रम घेत असतात. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर असतात. अशावेळी पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देतात. गोपीनाथ गडावरील मेळाव्यावाला गोपीनाथ मुंडेंविषयी आस्था असणारे अनेक आमदार, माजी आमदार उपस्थित राहतील. यात माझ्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित, विनोद तावडे, गिरिश महाजन, आमदार माधुरी मिसाळ, माझ्या जिल्ह्यातील काही आमदार यांचा समावेश असेल, असेही एकनाथ खडसे यांनी नमूद केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Tauktae Cyclone : मुंबईपासून150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

News Desk

धनंजय मुंडेंना अंबेजोगाई न्यायालयाकडून जामीन मंजूर

Aprna

आता महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर!

News Desk