HW News Marathi
देश / विदेश

नोटबंदीवरून संघाचा सरकारला घरचा आहेर

नवी दिल्ली- नोटाबंदी फसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही यात मागे नाही. भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघानेही नोटबंदीवर नाराजी व्यक्त केली असून नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेती आणि छोटय़ा उद्योगांना बसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. नोटाबंदीचे गंभीर परिणाम बांधकाम क्षेत्र, छोटे उद्योग आणि कृषी क्षेत्रातील मजुरांना भोगावे लागत आहेत. देशातील २५ टक्के आर्थिक व्यवहारांवर नोटाबंदीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्पष्ट मत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष साजी नारायणन यांनी मांडले आहे. मजुरांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करा, किमान मजुरीचा दर वाढवा, मजुरीसाठी सामाजिक सुरक्षा योजना लागू करा या मागण्या त्यांनी केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाथरस प्रकरणी CBIने दाखल केला ‘हत्येचा गुन्हा’, तपास सुरु

News Desk

पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांना घेरले, गव्हर्नरशी चर्चा करणार

News Desk

अंगणवाडी कर्मचारी-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर रक्कम

News Desk