HW News Marathi
मुंबई

पोलीस असल्याचे भासवून तीन विद्यार्थ्यांना लुटले

पुणे : शंकरशेठ रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या तीन मणिपुरी विद्यार्थ्यांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याचा प्रकारउघडकीस आला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मीरा हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीमुद्दिन आझम खान (१९, रा. भवानी पेठ, मूळ- मणिपूर) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खान व त्याचे मित्र लुचिंग्वा सिंग निगथॉव्जम व थौडाम विकाश सिंग शिक्षणासाठी पुण्यात आले आहेत. पूना कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्षाला ते शिकतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी खान व त्याचे मित्र सिम्बायोसिस कॉलेजसमोर मणिपुरी नृत्य करणार आहेत. त्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी खान व त्याचे दोन मित्र शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी जात होते. मीरा हॉस्पिटलसमोर आल्यानंतर दुचाकीवरून दोन व्यक्ती त्याच्याजवळ आल्या. त्यांना अडवून पोलीस असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, पोलिसांनीही याप्रकरणी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे विद्यार्थी व संघटनेचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तिन्ही रेल्वे मार्गावरी मेगाब्लॉक रद्द

News Desk

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

News Desk

खड्डे नसलेला रस्ता दाखवा, मंत्र्याला बक्षिस

News Desk