HW News Marathi
देश / विदेश

‘टाईम’च्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींचा वादग्रस्त उल्लेख

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरी देशभरात पंतप्रधान मोदींवर टीका होत असली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींचे अनेक पुरस्कार, सन्मान देऊन कौतुक झाल्याचेच चित्र आतापर्यंत पाहायला मिळत होते. मात्र, आता प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींना टीकेचे धनी व्हावे लागले आहे. ‘टाईम’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींना स्थान देण्यात आले असून ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘भारताला तोडणारा प्रमुख’ असा मोदींचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या मासिकाच्या मुखपृष्ठावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टाईम मासिकाच्या आशियायी आवृत्तीत विशेष लेख छापण्यात आला आहे. यालेखात पंतप्रधान मोदींच्या गेल्या ५ वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी महान राजकीय नेतृत्वांवर टीका केली. त्याचप्रमाणे मोदींनी कधीही हिंदू-मुस्लिम संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले नाहीत. तशी इच्छा देखील दाखविली नसल्याची टीका या मासिकातील देखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंडित नेहरूंचा समाजवाद आणि देशातील सध्याची सामाजिक स्थिती याबाबत देखील तुलनात्मक टिपण्णी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत जवानांकडून २ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

गुजरातमध्ये काळाचा घात, भरधाव ट्रकखाली चिरडून फूटपाथवर झोपलेल्या १३ मजुरांचा मृत्यू

News Desk

चार दिवसांपूर्वी व्हिडीओ कॅालवर तुला पाहिल,तु काय केलंस राजीव ! संजय राऊत भावूक

News Desk