HW News Marathi
मनोरंजन

इंटीमेट सीन्स करताना प्रचंड घाबरलेली मधुरिमा

मुंबई : नायरा बॅनर्जी अर्थात मधुरिमा या मॉडेल – अभिनेत्रीचा ‘वन नाइट स्टॅण्ड’ हा चित्रपट २०१६ साली आला होता. चित्रपटातील बऱ्याच इंटीमेट सीन्समुळे तो विशेष चर्चेत होता. नायराने हे सीन्स आत्मविश्वासाने केले असावेत, असे पडद्यावर बघून प्रेक्षकांना वाटते. मात्र वास्तव वेगळेच आहे. कारण हे सीन्स देताना ती प्रचंड घाबरलेली होती.

एका साप्ताहिकात दिलेल्या मुलाखतीत नायराने म्हटले की, इंटीमेट सीन्स देताना मी प्रचंड दडपणात होती. जवळपास क्रू मेंबर्स असल्याने असे सीन्स देताना प्रचंड घबराट होत होती. कारण मला भीती वाटत होती की, मला अशा अवस्थेत आईने बघितल्यास ती मला घराबाहेर काढेल. त्यावेळी नायराचे शूटिंग शेड्यूल खूपच व्यस्त असायचे. रात्रीच तिला शूटिंग करावी लागत असे. कारण दिवसा कन्नड चित्रपट ‘टायगर’साठी तिला बंगळुरू येथे जावे लागत असे.

अशात तिला खूप थकवा जाणवत असे. यामुळे ती दारूच्या आहारी गेली. नशेचा आधाराने ती दिवस-रात्र स्वत:ला व्यस्त ठेवत असे. याविषयी नायराने सांगितले होते की, अल्कोहोलमुळेच मला थकव्यापासून काहीसा आराम मिळत असे. जेव्हा मी इंटीमेट सीन्स देत असे तेव्हा मी नशेत असायची. त्यानंतर क्रू माझ्यासाठी लींबू-पाणी घेऊन येत असे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला फ्रेश होऊन बंगळुरूला जाणे शक्य होत असे. मात्र हा सर्व अनुभव माझ्यासाठी भयावह असल्याचेही नायराने सांगितले.

दरम्यान, जॅसमिन डिसूझा यांनी दिग्दर्शित केलेला ‘वन नाइट स्टॅण्ड’ हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नव्हता. चित्रपटात रती अग्निहोत्री यांचा मुलगा तनुज वीरवानी, नायरा बॅनर्जी आणि सनी लिओनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पॉर्न स्टार सनी लिओनीमुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kumbh Mela 2019 : आज पहिले शाहीस्नान

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

News Desk

तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची स्थापना

News Desk