भोपाळ | लोकसभा निवडणुकीच्या शेवटचे दोन टप्पे शिल्लक आहे. या टप्प्यात महत्त्वाच्या लढती आहेत. त्यापैकी भोपाळ मतदारसंघात काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपचे उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यात दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी आज (८ मे) निघालेल्या रोड शोसाठी साध्या वेशात तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या गळ्यात भगवे उपरणे घातलेले दिसून आले.
Bhopal: Police personnel in civil uniform seen wearing saffron scarves at the roadshow of Computer Baba and Digvijay Singh (Congress candidate from the Lok Sabha seat); a policewoman says "we've been made to wear this". #MadhyaPradesh pic.twitter.com/RN8UUN2oMC
— ANI (@ANI) May 8, 2019
आम्हाला साध्या वेशात आणि भगवे उपरणे घालून येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती यावेळी उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे. यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले. मध्य प्रदेशात आज (८ मे) काँग्रेस सोबतच भाजपचाही रोड शो आहे. दिग्विजय सिंह यांच्या रॅलीमध्ये कॉम्प्युटर बाबांसह अनेक साधू-संत सहभागी झाले आहेत. भोपाळमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे.
Bhopal: #Visuals from the roadshow of Computer Baba and Digvijay Singh (Congress candidate from Bhopal Parliamentary constituency). #MadhyaPradesh pic.twitter.com/iovEGWJuxS
— ANI (@ANI) May 8, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.