HW News Marathi
महाराष्ट्र

भेंडवळची भविष्यवाणी : यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस, देशात स्थिर सरकार येणार !

भेंडवळ | साडेतीनशे वर्षाचपासूनची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज (८ मे) सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि सुपारी कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. यांनतर यंदाच्या वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारणच राहणार असून देशात स्थिर सरकार येण्याचा अंदाज भेंडवडच्या भविष्यवाणीतून वर्तविण्यात आले आहे. तसेच घटमांडणीमध्ये ठेवलेली करंजी पार हललेली आहे, त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते, असेही भाकीत मांडण्यात आले.

पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली बुलडाण्यातील भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे.

भेंडवळने पिकांबाबत असा अंदाज वर्तवला

  • अंबाळी – मोघम, रोगराई नाही.
  • कापूस – मोघम उत्पादन असून भाव मध्यम राहिल.
  • ज्वारी – पीक सर्व साधारण येईल, भावात तेजी मात्र राहणार नाही.
  • गहू – पीक मोघम स्वरुपाचे राहिल.
  • तांदूळ – मोघम उत्पादन होईल.
  • तूर – पीक चांगले राहिल.
  • मूग – मोघम उत्पादन राहिल.
  • उडीद – सर्वसाधारण उत्पादन राहिल.
  • तीळ – मोघम स्वरुपाचे उत्पादन राहिल.
  • भादली – रोगराई शक्य.
  • बाजरी – उत्पादन सर्व साधारण असले तरी भावात तेजी राहिल.
  • हरभरा – सर्व साधारण स्वरुपाचे उत्पादन राहिल.

पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले. त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरचे आरोप”, प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

News Desk

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार! – एकनाथ शिंदे

Aprna

बीडमधील परळी वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला RDX ने उडवण्याची धमकी

News Desk